बरणीमध्ये छापण्यासाठी लेख द्या

आमच्या संकेतस्थळासाठी तुम्हाला लेख लिहायला आवडेल का?

राजकारण, बातम्या, आत्मकथन, ललित आणि काही विवादास्पद विषय सोडून इतर कोणत्याही विषयावरील लेख आम्ही स्वीकारू शकतो.

शक्यतो तुम्ही ज्या विषयातले तज्ज्ञ आहात त्या विषयावर लेख लिहा असं आम्ही सुचवतो. अर्थात असं काही बंधन नाही.

लेखकांनी पुढील बाबींची नोंद घ्यावी :
  • लेख किमान ५०० शब्दांचा असावा. कमाल शब्दमर्यादा नाही.
  • लेखात शुद्धलेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • लेखात “आज, काल, उद्या, परवा, गेल्या महिन्यात” – असे शब्दप्रयोग टाळावेत. कालनिश्चिती आवश्यक असल्यास नेमका दिनांक पुरवावा.
  • लेख माहितीपर असावा; दिलेली माहिती संदर्भासहित असावी. ठरावीक माहितीच्या स्रोताची लिंक उपलब्ध असल्यास आवश्यक त्या जागी ती पुरवावी. तुम्हाला मिळालेल्या माहितीची जशीच्या तशी नक्कल करू नये. तसे करायचे असल्यास सदर माहिती योग्य त्यांस श्रेय देऊन उद्धृत करावी. असे उद्धृत १०० ते १५० शब्दांहून अधिक नसावे.
  • आम्ही सहसा लेखांमध्ये अनावश्यक काटछाट / बदल करत नाही, पण क्वचित SEO च्या गरजांची पूर्तता करण्यासाठी लेखाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता आम्ही काही सुधारणा करू शकतो. उदा. शीर्षक, उपशीर्षक, प्रस्तावना.
  • लेखात कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर टीका होत असल्यास त्या टिकेची संपूर्ण जबाबदारी लेखकाची राहील. अशी टीका अपमानकारक असणार नाही याची काळजी घ्यावी.
  • आम्ही अद्याप मानधन देत नाही. त्यामुळे बरणीवर छापलेले लेख इतर ठिकाणी छापायला आपण मोकळे आहात. तरीही, जर आपणास एखाद्या लेखासाठी आमच्याकडून मानधन मिळाले असेल, तर मात्र सदर लेख इतर ठिकाणी आमच्या अनुमतीशिवाय छापू नये, ही विनंती.
  • लेखात दिलेल्या माहितीच्या सत्यासत्यतेच्या पडताळणीसाठी लेखक सर्वस्वी जबाबदार राहील.
  • लेख कधी छापायचा, छापायचा की नाही, छापलेला लेख काढून टाकायचा की नाही, याविषयीचे अधिकार संपादकांकडे राहतील.