इस्टरच्या अंड्यात कोणती कथा दडली आहे?

इस्टर हा सण म्हणजे एका अर्थाने तिकडच्या वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक करणारा, स्वागत करणारा उत्सव आहे. गोठवून टाकणारी थंडी संपलेली असते. काळे करडे बर्फाळलेले दिवस मागे पडलेले असतात. सूर्यकिरणांच्या उबदार सहवासाने सृष्टी विविध रंगात न्हाऊ पाहात असते.

Read more

सियाचीनचा इतिहास – ऑपरेशन मेघदूत आणि सद्य परिस्थिती

भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरच्या भूप्रदेशासाठी सतत संघर्ष सुरु असतो. त्यात चीनचाही हस्तक्षेप सुरु आहेच. भारतीय भूमीवर बळजबरीने ताबा मिळवून पाकिस्तानने तो परस्पर चीनला आंदण म्हणून देऊनही टाकला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि चीन यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय प्रदेशांना एकमेकांशी संपर्क ठेवण्यात जर अडचण असेल तर ती म्हणजे भारताचा सियाचीनचा प्रदेश! हा प्रदेश हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानचे सतत प्रयत्न सुरु असतात. याच्या इतिहासाची माहिती वैभव आपटेने लिहिलेल्या लेखात वाचा.

Read more

रामाला एक बहीण होती हे अनेकांना माहिती नसतं

ती होती. पण वाल्मिकी रामायणात तिचा उल्लेख मिळत नाही. पण तसं म्हणायचं तर आजच्या रामायणामधल्या म्हणून प्रचलित अशा कित्येक गोष्टी वाल्मिकी रामायणामध्ये नाहीत. उदा. लक्ष्मणरेषा

Read more

तेरा आकड्याचा महिमा : शुभाशुभ समजुती आणि गमतीजमती

तेरा आकडा अनेक संस्कृतींत अशुभ मानला जातो हे तर सर्वश्रुत आहे. पण सगळीकडे तो एकाच कारणामुळे अशुभ मानला जातो असं नाही, किंबहुना सगळीकडे तो अशुभच मानला जातो असंही नाही. या आकड्याला एवढं महत्त्व मिळण्यासारखं नेमकं काय घडलंय, आणि त्याची धास्ती बाळगून तेरा आकड्याशी कमीत कमी संबंध ठेवण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याबद्दलची रंजक माहिती मिळवा सिद्धार्थ अकोलकर यांच्या नव्या लेखातून.

Read more

शोध शून्याचा (२) – बखशाली हस्तलिखित प्रत

आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला असं आपण जिथे तिथे वाचत असतो. आज जे चिह्न शून्यासाठी आपण वापरतो त्याचा उगम इसवी सनाच्या आठव्या शतकात झाला असा समज प्रचलित आहे. पण इतिहास संशोधनाची प्रक्रिया अखंड सुरु असते आणि त्यामुळे नवनवीन शोध सतत लागत असतात, ज्यांतून त्याआधीच्या गृहीतकांना छेद मिळत असतो. कौस्तुभ निमकर यांनी लिहायला घेतलेल्या लेखमालिकेतला हा दुसरा लेख, प्राचीन भारतात ‘शून्य’ कसा विकसित होत गेला यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा आहे.

Read more

शोध शून्याचा – दशमान पद्धतीचं महत्त्व

प्राचीन काळापासून भारतात अनेक विषयांचा सखोल अभ्यास होत आला आहे आणि त्यात गणितही आलेच. वैदिक काळापासून भारतीयांनी गणितात काय प्रगती केली होती याबद्दल बरेच ऐकण्यात आणि वाचण्यात येते. दुर्दैवाचा भाग हा की यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या अवाजवी मोठ्या करून सांगण्यात येतात.

Read more

आशियाई क्रीडा स्पर्धांचा इतिहास

१५ सुवर्ण २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकं मिळवत २०१८ मध्ये भारतीय चमूने इंडोनेशियात आजवरची (भारताबाहेर भरवण्यात आलेल्या खेळात) सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

Read more

सुरिनाम – दक्षिण अमेरिकेतल्या या देशात हिन्दुस्थानी भाषा बोलली जाते

सुरिनाममध्ये एका विशिष्ट अशा धर्माचा पगडा नाही. अर्थात ४८% लोक ख्रिश्चन असल्यामुळे तो ख्रिश्चन देश ठरवला जातो. पण हिंदूंची संख्या २३% इतकी आहे. त्यामुळे हिंदूंच्या सर्व प्रकारच्या जाती आणि पंथ तिथेही आहेत.

Read more

पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये घुसणाऱ्या पहिल्या स्त्रिया

१८९६ सालच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पहिल्यांदा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. हा क्रीडाप्रकार केवळ पुरुषांसाठी राखीव होता.

Read more

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि जॉर्ज वॉशिंग्टनच्या कवळ्या

वदंता अशी आहे की त्याच्या कवळ्या लाकडाच्या होत्या. पण हे खरं नसल्याचं आता उघडकीला येतंय. जॉर्ज वॉशिंग्टनकडे बऱ्याच कवळ्या होत्या आणि त्यांपैकी एकही लाकडाची नव्हती, हे आता इतिहास संशोधकांनी सिद्ध केलंय.

Read more