About Us

जगात अभ्यासायचे विषय अगणित आहेत, आणि त्या विषयांच्या संबंधाने आपल्याला सतत नव्याने मिळणाऱ्या अचाट माहितीच्या महासागरात, नेमकं काय वाचू अन् काय नको अशा गोंधळात आपण पडलेलो असतो. बहुतेकवेळा अशा गोंधळामुळे काहीच धड वाचलं जात नाही. करायचं तरी काय ?

सादर आहे बरणी !!

बरणीच्या माध्यमातून रंजक पद्धतीने, सोप्या शब्दांत, वेगवेगळ्या विषयांवर शक्य तितकी माहिती थोडक्यात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लांबलचक रटाळ माहिती कशीबशी घशाखाली ढकलत राहण्याची कसरत आता करायला नको. कधीही मनात आलं, की बरणी उघडून तुम्हाला हवा तेवढा माहितीचा फराळ करून घ्या, आणि तृप्त व्हा.

ज्ञानाची, विचारांची आणि माहितीची ही बरणी रिकामीच होत नाही. त्यामुळे वाचक कधीही भुकेला राहणार नाही. आणि अशा रंजक पद्धतीने मांडलेल्या माहितीचा कितीही आस्वाद घेतलात, तरी तुम्हाला कधीच अजीर्ण होणार नाही, हा आमचा शब्द आहे.

चला तर मग, येताय ना आमच्याकडे, माहितीच्या फराळाला?